Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. माळशिरस हा मतदारसंघ राखीव असून त्या मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला.
Download WordPress Themes Nulled and plugins.














































