Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी 29 एप्रिल रोजी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. मध्यरात्री 12 वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. यावेळी नगरसेवक विजय चिपळेकर हे प्रशांत जाधवला आठ ते दहा लोकांसोबत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले आहेत
Download WordPress Themes Nulled and plugins.











































