आपल्या आवाजाच्या जादूने अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गुणी व सुफी गायक म्हणून सर्वश्रुत असणारा जावेद अली म्हणतोय, सारे जहा में अलगसा छाया है ! कारण त्याच्या आगामी चित्रपटाच्या गीताचे हे बोल आहेत. त्याचा ‘पुणे टू गोवा’ हा आगामी चित्रपट असून या चित्रपटात त्यानं हे एक गाणं गायलं असून हे जर्णी गीत आहे. नुकतंच त्यानं हे गाणं रेकॉर्ड केलं. या प्रसंगी बोलताना जावेद अली म्हणाले की आजवर मी अनेक गीते गायली मात्र हे जर्णी गीत गाताना मला खूप मज्जा आली. हे गीत प्रत्येकाला नक्की आवडेल. कारण या गीतात धम्मला मस्ती आणि उत्साहपूर्ण आहे. ते पुढे म्हणाले की आपण अनेक जन प्रवास करतो. आपला प्रवास हे गीत नक्कीच सुखकर करेल असे मला वाटते. तर हे गीत पी.शंकरम यांनी संगीतबद्ध केले आहे.

मोरया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटात निर्माते प्रल्हाद तावरे, रविंद्र हरपळे हे आहेत तर सह निर्माते नवनाथ जाचक, किशोर खरात, यश काळे, विठ्ठल घुगे, मारुती मानवर हे आहेत. या चित्रपटाची कथा फिल्मी स्ट्रगलर कलाकारच्या ट्रीपवर बेतली असून पुण्यावरून गोव्यामध्ये जाताना प्रवासा दरम्यान तिथे काय काय गंमती – जमती घडतात. यावर आधारित ती आहे.
नव्या दमाचा दिग्दर्शक अमोल भगत याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिव धनुष्य उचलले असून अमोल या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
या चित्रपटात हिंदीतील तगडी स्टार कास्ट काम करत असून लवकरच त्यांची नावे आपणांस कळतील. असे दिग्दर्शक अमोल भगत यांनी सांगितले.











































