जनसंपर्क न्यूज – पुणे – मध्यरात्रीत कोंढवा, तालाब कंपनीसमोर बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मोठी सीमाभिंत कोसळली; अग्निशमन दलाकडून प्राथमिक माहितीनुसार दरम्यान या दुर्घटनेत एकूण 1 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखालून 3 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी अशी माहिती एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

हवेली तालुका कोंढवा बु मधील अल्कोन स्टायलिश सोसायटी ची सुरक्षा भिंत अंदाजे १२ ते १५ मजूर झोपड्या वर कोसळली आहे अग्निशमनतज्ञ दल , NDRF पोलीस याच्या मदतीने अदयापपर्यत १० मृत व २ जखमीना ढिगार्यातून काढण्यात आले असून शोधकार्य चालू आहे घटना 1.45 रात्री घडली.

मयतांची नावे

1)आलोक शर्मा -28 वर्षे
2)मोहन शर्मा -20 वर्षे
3)अजय शर्मा -19
4)अभंग शर्मा -19
5)रवि शर्मा -19
6)लक्ष्मीकांत सहानी -33
7)अवधेत सिंह -32
8) सुनील सींग -35
9) ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )
10)सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )
11) विमा दास -28
12) संगीता देवी -26

जखमी

1) पूजा देवी -28 वर्षे