जनसंपर्क न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , येरवडा पुणे – ०६ येथील सांस्कृतिक हॉल मध्ये झालेल्या धनादेश वितरण कार्यक्रम वितरण प्रसंगी महामंडळाचे अध्यक् ष मा . श्री . अमित गोरखे बोलत होते . महामंडळाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त , पुणे प्रादेशिक विभागातील पुणे जिल्हा कार्यालयामार्फत पुणे येथे मंजूर कर्जाच्या धनादेशांचे वितरण व वृक्षारोपनाचा कार्यक्रम महामंडळाचे अध्यक्ष मा . श्री . अमित गरजे , यांचे शुभहस्ते महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक , श्री . दि . खं . खुडे , व जिल्हा व्यवस्थापक , श्री . शि . लि . मांजरे , यांनी आयोजित केला होता . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री . अविनाश देवसटवार , प्रादेशिक उपायुक्त , समाजकल्याण पुणे विभाग , पुणे यांनी भुषविले होते .
या कार्यक्रमात पुणे जिल्हा कार्यालयांतर्गत वीजभांडवल योजनेंतर्गत २३ व अनुदान योजनेंतर्गत ०१ ( एक ) लाभार्थीस महामंडळामार्फत बँकांनी मंजूर केलेल्या रु . १० . ५० लाख कर्जापैकी महामंडळाचे बीजभांडवल रु . १ . ७० लाख व अनुदान रु . ४० हजार प्राथिनिधीक स्वरुपात महामंडळाचे अध्यक्ष मा . श्री . अमित गोरखे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले . महामंडळ वेगवेगळ्या महामंडळाच्या चांगल्या योजना भविष्यामध्ये रावविण्यार येणार असल्याचे श्री . अमित गौरखे यांनी सांगितले .
महामंडळमार्फत तळागाळातील समाजपर्यत योजनांचा लाभ मिळविण्याकरिता, कार्यकर्त्यांनी कामकाजासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्नशील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी मातंग समाजातील अनुसूचित जमातींनी आवाहन केले.  महामंडळाचे कामकाज ऑनलाइन करत आहे हेही घोषित केले आहे.  शासनाकडून महामंडळास लवकरच आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल.  इतर बंद असलेल्या महामंडळाच्या योजनाही सुरु आहेत.  सदर कार्यक्रमप्रसंगी समाजसेवाधिकार अधिकारी, श्री.  विशाल लोंढे, श्री.  हरेश्वर  डोंगरे, समाजकल्याण विभाग चे पुणे येथे सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व महामंडळ अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते श्री.  प्रदिप अवघडे, श्री.  सुनिल बेजगमवार, माजी.  नगरध्यक्ष, कोंडलवाडी, श्री.  राजेश राजगे, श्री. सागर गायकवाड, दिपक चकाले आणि इतर कार्यकर्ते, लाभार्थी उपस्थित होते.