जनसंपर्क न्यूज – संपूर्ण भारतीय कलाविश्वासे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत मानाच्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे.
संपूर्ण भारतीय कलाविश्वासे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत मानाच्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे. तर आयुष्यमान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे स्टारर ‘अंधाधुन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे,
दरवर्षी एप्रिल महिन्यात या पुरस्कारांची घोषणा होते. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी एक समिती नेमण्यात येते ज्यामध्ये नि:पक्षपातीपणाने विजेते निवडले जातात. जाहीर झालेले राष्ट्रीय पुरस्कार :
सर्वोत्कृष्ट चित्रपट-अंधाधून, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन-कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत), सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी, सर्वोत्कृष्ट ऍक्शन चित्रपट-केजीएफ, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट-भोंगा, पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो, सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन, पर्यावर संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी), सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी), सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधकर रेड्डी (नाळ), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी), सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ), सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट तारीख, सर्वोत्कृष्ट ऍडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून.











































