जनसंपर्क न्यूज – खंडाळा : सातारा जिल्हातील खंडाळा तालुक्याचे सुपूत्र समाजकारण व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातुन राज्यभर ठसा उमटवुन राजकीय क्षेत्रात देखिल उल्लेखनीय कामगिरी करणारे जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिवसेना मा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
नवी मुंबई येथील आण्णासाहेब पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण युवा मंच मुंबई यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘ यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात येते . या वर्षीचा राजकीय क्षेत्रातील उठावदार कामगिरीसाठी पुरुषोत्तम जाधव यांना माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी माजी खासदार संजीव नाईक, शिवसह्याद्री सहकारी बॅकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वांगडे, स्थायी समिती सभापती संपतराव शेवाळे, भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार, मुंबई जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संजय शेटे, जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे, नवी मुंबई मनपा नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, मंचचे अध्यक्ष संजय सावंत, अमित शेटे, सचिन आचरे, सचिव सुभाष बावडेकर यांसह प्रमुख उपस्थित होते .