Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून मा. स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या घेऊन नुकतीच पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत प्रचंड जनसमुदाय जमला होता विशेष करून यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता अक्षरशः शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी सदानंद शेट्टी यांना खांद्यावर घेऊन उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आणले होते. सदानंद शेट्टी यांनी अप्रत्यक्षपणे रमेश बागवे यांच्याविरोधात दंड थोपटले आहे.
अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की काँग्रेस पक्षाने केली नेहमीच निष्ठेची विष्ठा ! तीन वेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे व एकदा निवडून येणारे , त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात उडी घेऊन दोन वेळा निवडणूक लढवून मंत्री असताना २०१४ ला पराभूत झालेले उमेदवार श्री . बागवे यांना परत तिकीट दिली. सन २०१४ ला मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली असता , ते विद्यमान आमदार असल्याने त्यांना डावलता येत नाही हे कारण सांगून मला डावलले . मी पक्षाचे ऐकलेही व त्यांचे प्रामाणिकपणे कामही केले ; पण ते पराभूत झाले . त्यानंतर पक्षाने त्यांना शहर काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविण्याची संधी दिली आणि आता परत २०१९ ला तिकिटाच्या स्पर्धेत आम्ही दोघेही असताना पुन्हा ते शहराध्यक्ष आहेत म्हणून प्राधान्याने त्यांना संधी दिली व पुन्हा मला डावलले .
ते पुढे म्हणाले की मला खऱ्या अर्थाने या मतदारसंघात झोपडपट्टीवासियांचा प्रश्न बिकट असून मध्यमवर्गीय व गोरगरीब वस्तीही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची व या मतदारसंघात अनेक विकासकामे प्रलंबित असल्याने ती मला करायची असल्याने श्रेष्ठींना आवर्जून सांगण्यात मी कुठेही कमी पडलो नाही व तसे , श्रेष्ठींचे मला तिकीट देण्याची मानसिकताही तयार झाली होती पण काही एक – दोन श्रेष्ठी हे माझ्या महानगरपालिका निव डणुकीच्या तिकिटापासून ते आतापर्यंत माझं सामाजिक व राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचा विडाच उचलला होता असे मला वाटते . माझ्यासारख्या एकनिष्ठ सर्वसामान्य कार्यकर्त्याची काय गरज ! महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेला , काँग्रेस व म . न . से . सदस्य संख्या २८ – २८ होती . विरोधी पक्षनेतेपद कोणाला ? तेंव्हा माझी गरज त्यांना वाटली आणि त्या पोटनिवडणुकीत मी काँग्रेसचा उमेदवार सर्व ताकदीनिशी निवडून आणला व विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळाले . याची विसर पडलेली दिसतेय . तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढणार , ते मी आजवर केलेल्या जनहिताच्या कामांच्या जोरावर निवडून येत असल्यास लढवेन .
अन्यथा पक्षाचा उमेदवार पराभूत व्हावा हा माझा हेतू नक्कीच नाही . यांचा आणि माझा कुठलाही वाद नाही . पण माझ्यावर वारंवार अन्याय झाला हे नक्की आहे . त्याचे निरसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही . वेळप्रसंगी मी पक्षाचा व प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटी या पदांचा राजीनामाही देईल . नाही तिकीट तर नाही . ज्या लोकांची आजवर सेवा केली ती तशीच यापुढे देखील करत राहील . माझ्या रक्तामध्येच कार्य आहे . पण पक्ष श्रेष्ठीची नियत कळली . पक्ष नाही तर झोपडपट्टी संघटनमार्फत मी समाजकार्य करत राहील . पण माझ्याबरोबर मीच राहील . कुठल्याही माझ्या प्रिय कार्यकर्त्याला पक्ष सोडण्यासाठी व पक्षाचे काम न करण्यासाठी दबाव टाकणार नाही किंवा माझी पत्नी सध्या कार्यक्षम नगरसेविका असून त्यांनाही मी पक्षकार्यापासून वंचित ठेवणार नाही हे आपणांस प्रचारात दिसेलच पण माझ्यावर अन्याय झाला . त्याचं निरसन जोपर्यंत होत नाही , तोपर्यंत माझी भूमिका तटस्थ राहील . आजवर जितक्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर काम केले . त्यांची मी आमदार होण्याची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही , त्याबाबत मी दिलगीर आहे.
आज पर्यंत जे मोजकेच नेते मला प्रत्येक वेळी विरोध करतात त्या नेत्यांन बद्दल मी अनावधानाने कधी काही बोललो का बोललो असेल तर त्या नेत्यांची मी जाहीर माफी मागतो आता तरी त्या नेत्यांनी थांबावे.
नगरसेविका सुजाता शेट्टी, साक्षात शेट्टी, उमावती शेट्टी, मेहबूब शेख, अकबर शेख, मंगेश साखरे, गफार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































