जनसंपर्क न्यूज – पुणे लोकमान्य फेस्टीवलच्या वतीने नवरात्र महोत्सवात आम्ही गेली २१ वर्ष पुणे शहरातील नागरीकांचे आकर्षण असलेला ‘ रावण दहन ‘ हा कार्यक्रम घेत असतो पुणे शहरातील विविध भागातून हा कार्यक्रम पहाण्यासाठी आपल्या लहान मुलांसह हजारो पालक हजेरी लावतात व वाईट शक्तीचे दहन कसे होते याची माहीती आपल्या लहानग्यांना देत असतात . मागील २१ वर्षाच्या काळात अनेकदा निवडणूकांच्या आचारसंहिता लागू होत्या परंतू कधीही ‘ रावण दहन ‘ या कार्यक्रमास आचारसंहितेचा ‘ बडगा ‘ दाखवून परवानगी नाकारली नाही परंतू सिंहगड पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री . नंदकुमार शेळके यांनी निवडणूकीच्या काळात जमावबंदी आदेश ( ३७ ) ( १ ) ( ३ ) प्रमाणे प्रतिबंधत्मक आदेश लागु केल्याचे सांगुन आम्हाला परवानगी नाकारली पुणे शहरात जमावबंदीचा आदेश आहेत तर निवडणूकीचे फॉर्म भरणारे उमेदवार यांच्यावर आपण कोणती कारवाई केली कारण ५ किंवा ५ पेक्षा अधिक नव्हेत हजारो कार्यकर्ते त्यांच्या रॅलीत होते . व निवडणूकीच्या काळात जमावबंदी असणे म्हणजे ‘ आणीबाणी ‘ च असल्यासारखे वाटत आहे . आम्ही हा कार्यक्रम अनेक वर्ष लोकमान्य नगर या ठिकाणी घेत होतो त्यानंतर ती जागा अपूरी असल्याने आम्ही डेक्कन जिमखाना येथे नदीपात्राजवळ हा कार्यक्रम घेतला त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल , टिळक रोड या मैदानावर त्यापूर्वी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर अशा विविध ठिकाणी हा कार्यक्रम घेतला . या सर्व ठिकाणी हजारोंच्या संख्येने पुणेकर नागरीक सहभागी झाले होते .

याही वर्षी ‘ रावण दहन ‘ हा कार्यक्रम शिंदे मैदान , फन टाईमच्या मागील बाजूस , सिंहगड रोड या भव्य मैदानावर घेण्याचे निच्छीत केले त्या प्रमाणे संबधीत जागा मालकाची ना हरकत पत्र , अग्निशमन कार्यालयाचे नाहरकत पत्र , स्पिकर , जनरेटर , लाईट व मंडप यांच्या मालकाच्या पत्रासह आम्ही दि . २८ सप्टेंबर २०१९ रोजी अर्ज सिंहगड रोड पोलिसांना सादर केला त्याच वेळी त्यांनी मा . पोलीस उपायुक्त परीमंडल क्र . ३ यांना भेटण्यास सांगितले या प्रमाणे आम्ही त्यांच्या कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . गवते साहेब यांची भेट घेतली त्यांनी सर्व बाब मा . उपायुक्तांना सांगितले त्यानंतर श्री . गवते साहेब यांनी मा . पोलीस निरीक्षकांना योग्य त्या सूचना देऊन सदर अर्जावर योग्य तो निर्णय घ्या असे सांगितले त्यानंतर लगेच आम्ही त्यांना भेटलो त्यांनी काही कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितले ती सर्व कागदपत्रे घेऊन पुन्हा श्री . शेळके साहेब यांना भेटण्यास गेल्यावर त्यांनी दि . ३ ऑक्टोबर २०१९ रोजी परवानगी नाकारल्याची सी . आर . पी . सी . १४९ प्रमाणे नोटीस दिली . या नंतरही आम्ही पुन्हा मा . पोलीस उपायुक्त क्र . ३ यांची समक्ष भेट घेतली असता आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असल्याने व आचारसंहिता लागू असल्याने आपणास परवानगी देता येणार नसल्याचे सांगितले म्हणजेच राजकीय पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते यांनी कोणतेही जाहीर कार्यक्रम करायचे नाही का ? या पूर्वी गेली २१ वर्षामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा , बॅनर लावता अराजकीय स्वरुपाचे व्यासपीठ तयार केलेले असताना सुध्दा कायद्याचा हा बडगा कसला ? या पूर्वी २० वर्षामध्ये अनेक सार्वजनिक निवडणूका झाल्या , त्याही वेळी आचारसंहीता लागू होती परंतू कधीही आचारसंहीतेचे कारण सांगुन परवानगी नाकारली नाही . कोणतेही नैसर्गिक संकट आल्यास राजकिय कार्यकर्तेच सर्वात पुढे असतात मात्र राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने परवानगी नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या या निर्णया विरोधात आम्ही सोमवार दि . ७ ऑक्टोबर २०१९ रोजी न्यायालयातही दाद मागणार आहोत . व त्या पुढील सर्व जबाबदार ही पोलीस प्रशासनावर असेल . रावणाच्या प्रतीकृतीची तयारी पूर्ण झाली असून पोलीसांनी परवानगी नाकारल्याने या प्रतीकृतीचे दहन करावे की पुराच्या पाण्यात विसर्जन करावे हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला आहे .