Home ताज्या घडामोडी सदानंद शेट्टी ठरले पुणे कॅन्टोन्मेंटचे किंग मेकर

सदानंद शेट्टी ठरले पुणे कॅन्टोन्मेंटचे किंग मेकर

816

सदानंद शेट्टी यांनी खेचुन आणला विजयश्री

जनसंपर्क न्यूज – पुणे – पुण्यातील अतिशय महत्त्वाची असलेली व चुरशेची ठरलेली लढत म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंटची या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे उभे होते. त्यांचा विजयश्री खेचुन आणण्यासाठी सदानंद शेट्टी यांनी अथक परिश्रम घेतले होते. माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेले शेट्टी हे निवडणुकीच्या येन रणधुमाळीत शेट्टी यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुण्यात जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळीच मुख्यमंत्री म्हणाले होते.

सदानंद शेट्टी हे भारतीय जनता पक्षात आल्याने पुणे कॅन्टोमेंट मध्ये भाजपची ताकत वाढली आहे. याचाच फायदा आजच्या निवडणूक झालेला दिसत आहेत.

यावेळी शेट्टी म्हणाले की सोमवार आणि मंगळवार पेठेतून आम्ही महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना मोठ्या प्रमाणात लीड दिले असून मी सोमवार आणि मंगळवार पेठेतील नागरिकांचा तसेच सदानंद शेट्टी मित्रपरिवार, अश्विनी मित्र मंडळ यांचा मी आभारी आहे