जनसंपर्क न्यूज – पुणे दि. 19 :- पुणे विभागातील 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 996 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 352 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 172 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 280 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 69 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 996 आहे. कोरोनाबाधित एकूण 215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 165 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 157, सोलापूर जिल्ह्यात 53, कोल्हापूर जिल्ह्यात 40, सातारा जिल्ह्यात 5, सांगली जिल्ह्यात 2 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 138 कोरोना बाधीत रुग्ण असून 75 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 61 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 443 कोरोना बाधीत रुग्ण असून 165 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोना बाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 52 कोरोना बाधीत रुग्ण असून 33 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 83 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 68 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 56 हजार 430 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 46 हजार 992 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 495 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 41 हजार 916 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4 हजार 996 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 17 लाख 94 हजार 763 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 6 लाख 82 हजार 626 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 307 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
पुणे विभागातील 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 हजार 996 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































