lप्रतिभा पाटील यांच्याकडून –  कोल्हापूर – कालपासून जिल्ह्याला धक्यावर धक्के बसत आहेत. काल (ता. १७ )सकाळी चार, सांकाळी चार कोरोना पाॅझिटिव्ह पेशंट सापडल्यानंतर रात्री उशीरा सहा जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. रविवारी नव्या १४ रूग्णांची भर पडल्यानंतर सोमवारी सकाळी सकाळीच पुन्हा पाच जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. हे धक्के सुरू असतानाच दुपारी पुन्हा दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. हे धक्के सुरू असतानात आता काळजात धडकी भरविणारी माहीती समोर आली आहे. नुकत्याच आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात आणखी दहा जणांना कोरनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात काल (ता. 17) एका दिवसात 14 रुग्ण आढळले आहेत. हा धक्का सहन होण्याआधीच आजच्या दिवसाची सुरुवातही नव्या पाच रुग्णांसह झाली. तर दुपारी पुन्हा दोन रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यातच आता आकरा जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आणखीनच भितीचे वातावरण तयार झाले आहे. आताच्या दहा जणांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 66 वर पोहोचली आहे.

आता सापडलेल्या रूग्णांपैकी पन्हाळा तातुक्यातील पिंपळे तर्फ ठाणे येथील एक, राजारामपुरीतील तीन, हालेवाडी (ता. आजरा) येथील दोन शाहुवाडी येथील चार जणांचा समावेश आहे.