Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज पुणे : देशभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसमुळे अनेकांचे हाल झाले. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा एक गंभीर विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर तळागाळातील लोकांसाठी एक मदतीचा हात पुढे आला. तब्बल 71 दिवस झोपडपट्टीवासी, बेघर कुटुंब, गरीब मजूर यांना रेशन किट, औषधे, सॅनिटायझर, मास्क आदी देऊन मोलाची मदत दलित पँथरचे महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केली. त्यांच्या या कार्याची दखल केंद्रीय न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली. त्याचबरोबर दलित पँथरचे महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत नडगम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच विविध महत्वाच्या मुद्यांवर या वेळी चर्चा देखील करण्यात आली.
Download WordPress Themes Nulled and plugins.













































