Home क्रीडा हणबरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योगदीन उत्साहात साजरा

हणबरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योगदीन उत्साहात साजरा

254

१०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे 

जनसंपर्क न्यूज ( मसूर प्रतिनिधी) – हणबरवाडी (मसूर) येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी योग विषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. याप्रसंगी हणबरवाडी (मसूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेजवळ, शिक्षिका सुनंदा पाटील, सीमा राऊत, विठ्ठल पवार, प्रज्ञा वरुडे आणि जवळपास १०० विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्वतः शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी उभे राहून आणि बसून  सूर्यनमस्कार, प्राणायाम, अनु विलोम, भ्रमरी, वृक्षासन यांसह वेगवेगळी योगासने केली. सकाळच्या नयनरम्य व चैतन्यमय वातावरणात उत्साहात योगदिन साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना शेजवळ म्हणाले की संयुक्त राष्ट्र संघाने सन २०१५ पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. याच दिवशी सर्वात पहिले योगी म्हणून गणले जाणारे शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून २१ जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्यात येतो.