जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी -आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृत्तापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा गहाळ किंवा चोरीला जातो तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्याच्या त्यालाच माहीत असतात. असे रू. ३,७३,०००/- किमतीचे मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी अथक प्रयत्न करून चोरट्यांकडून मिळवले आणि ते मोबाईल चोरीला गेलेल्या व गहाळ झालेला नागरिकांना ते परत केले. असे लाख मोलाचे मोबाईल नागरिकांना जेव्हा मल्हारपेठ पोलिसांनी स्फूर्ती केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी नागरीकांचे हरविलेले मोबाईल शोध घेणेकामी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिलेल्या होत्या.
त्या अनुशंगाने पथकातील पोलीस स्टाफ ने सी.ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहीती प्राप्त करुन चिकाटीने व अथक परीश्रम करुन सदरची मोहीम राबविल्याने मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून नागरीकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ३,७३,०००/- रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. दिनांक 1 ऑगस्ट रोजी चेतन मछले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारपेठ पोलीस ठाणे याचे हस्ते मूळ तक्रारदारांना त्यांचे मोबाईलचे वाटप करण्यात आले. सदरची मोहीम मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. आँचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षक साो सातारा, मा. सविता गर्जे, पोलीस उपअधिक्षक साो, पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, आँचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, सविता गर्जे, पोलीस उपअधिक्षक पाटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक नितेश पोटे, पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सिध्दनाथ शेडगे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी केलेली आहे.















































