(सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टचा कौतुकास्पद उपक्रम)
प्रकाश शिंदे व सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टच्या वतीने नागपंचमी सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पुण्यातील नामांकित राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथील तब्बल 160 सरपटणारे प्राणी एक महिन्यासाठी घेऊन त्यांचे पालकत्व या संस्थेने स्वीकारले आहे. असा नागपंचमी सण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याने जनमानसात या संस्थेचे कौतुक होत आहे. तसे पाहिले तर नाग, विविध प्रजातीचे साप आणि सरपटणारे प्राणी शेतकऱ्याचे मित्र आहेत.
शेतीची तसेच शेतातील पिकांची नासदूस करणारे उंदीर शेतकऱ्यांचा व पिकांचा कर्दनकाळ ठरतात. अशावेळी साप या उंदरांचा नायनाट करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर सरपटणारे प्राणी देखील शेतकऱ्यांची विविध प्रकारे मदत करतात. अशा प्राण्यांना जीवनदान देऊन त्यांचं संरक्षण करा असे आवाहन प्रकाश शिंदे नागपंचमी सणाचे औचित्य साधून केले आहे.








































