जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – फोकलोर ॲन्ड कल्चरल हेरिटेज फाउंडेशन पुणे यांच्यावतीने एक दिवसीय वसंतोत्सवाचे आयोजन येत्या २५ एप्रिल रोजी केले असून सकाळी १०.०० वा. पहिला मजला, श्रमिक पत्रकार भवन नवी पेठ येथे प्रा.व प्रमुख ललित कला केंद्र गुरुकुल सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण प्रबंधक डॉ. जितेंद्र पानपाटील, तर प्रमुख अतिथी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते असणार आहेत. वसंतोत्सवाची सुरुवात चैत्रांगणाचे पूजन करून होणार आहे.सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर सत्कारमूर्ती ममता ताई सपकाळ,भाग्यश्री देसाई, नीलिमा पटवर्धन, संध्या पुजारी या सर्वांचा त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
यानंतर गौरी वनारसे व निकिता बहिरट यांच्या संबळ वादन आणि देवीचा जागरण होणार आहे. समाजसेविका ममताताई सपकाळ यांची विशेष मुलाखत डॉ.सुनीता धर्मराव घेणार आहेत.
दुपारच्या सत्रात लावणी सौंदर्यवती रेश्मा परितेकर, लावणी डॉ .सुखदा खांडगे यांचे कथ्थक,सौ.आश्विनी छत्रपती व संच पारंपरिक खेळ गाणी सादर करणार आहेत.अशी माहिती फोकलोर ऍण्ड कल्चरल हेरिटेज फाउंडेशनच्या संचालक डॉ. सुनीता धर्मराव व मृणालिनी खंदारे यांनी पत्रकाद्वारे दिली. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील.













































