अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या सचिवपदी दीपक कसबे यांची वर्णी

159

जनसंपर्क न्यूज –  पुणे शहर जिल्हा मातंग समाज साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या सचिवपदी यंदा दीपक कसबे यांची बहुमताने निवड करण्यात आली सदरील निवड प्रक्रिया ही व्हि. आय. पी गेस्ट हाऊस येथे पुणे शहर जिल्हा मातंग समाज समितीचे

अध्यक्ष मा. राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे, अंकल सोनवणे, मा. राज्यमंत्री रमेश दादा बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष जगताप, मातंग समाजाचे आजी – माजी नगरसेवक त्याच बरोबर इतर सदस्य उपस्थित होते .

भारतातील पहिला अण्णाभाऊ साठे स्मारक पुतळा असलेल्या या ठिकाणी हा महोत्सव येत्या १ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. दर वर्षी मोठ्या दिमखात स्वारगेट येथील सारबाग जवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो. या महोत्सवाच्या सचिवपदी यंदा दीपक कसबे यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या एका दशकापासून दीपक कसबे हे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. कसबे म्हणाले, की यंदा माझी लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे महोत्सवाच्या सचिवपदी निवड झाल्याने यंदाचा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्याचा माझा मानस आहे. यंदाच्या महोत्सवात शाहिरी, पोवाडे, व्याख्याने असे दर्जेदार कार्यक्रम तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.