सावंतवाडी,ता.१६
गोवा राज्याच्या विकासासाठी सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये ,सोनुर्ली , निगुडा, इन्सुली मधील घरांच्या व बागायतीच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.तसेच कानठळ्या बसणारे भूसुरुंग दररोज होत असल्याने लाेक त्रस्त आहेत.
दगड खाणीच्या क्वाँरी व्यवसायामुळे या चार गावांना नुकसान सोसावे लागत असूनही शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत हे दुर्दैवी आहे असे लाेक सांगतात. यामुळे उपोषण ही देखील हाेत आहेत गोवा राज्यातील झुआरी पूल ,अनेक रस्ते बांधकामांना लागणारा काळा दगड क्रश खडी इन्सुली निगुडे सोनुलीेॅ वेत्ये या गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या दगड खाणी झोन मधून निर्यात केला जात आहे

या ठिकाणी सुमारे १८ व्यवसायिकानी दगड खाण क्वाँरी व्यवसाय सुरु केला आहे. या ठिकाणाहुन सिंधुदुर्ग व गोव्यामध्ये काळा दगड खडी निर्यात करण्यास सुरुवात केली .यामुळे विहिरींचे पाणी खाेलवर गेले आहे.घराना भेगा देखील पडल्या असुन बागायतीचे नुकसान माेठ्या प्रमाणात घडत आहे
या सार्या घटनांकडे लक्ष वेधूनही महसुल यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत.लोकप्रतिनिधी तर काळा दगड खाण व्यावसायकांच्या विरोधात बोलतच नाहीत त्यामुळे सारेच अालबेल असल्याने त्रस्त शेतकरी व घर मालक आंदोलनही करत आले आहेत .परंतु आश्वासना पलीकडे काही नाही
इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये निगुडा साेनुलीेॅ या गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी १८ दगड खाणीचे व्यवसायिक स्थिरावले आहेत त्यात महामार्ग आणि गोव्यातील झुवारी पुलाचे काम करणारे रस्ते कंपनीचे व्यावसायिक काणठळ्या उडवणारे भूसुरुंग करत आहे याबाबत तक्रारी करूनही राजकीय नेते महसूल यंत्रणेने दुर्लक्ष केले असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत
या खाण व्यवसायिकांची पोहच दिल्लीपर्यंत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी सुद्धा तक्रारी गुंडाळून ठेवून या व्यवसायिकाच्या बरकतीसाठी मदत करत असल्याने सर्वसामान्यांचा वाली नसल्याचे चित्र आहे जनतेत घरानं भेगा किंवा शेती-बागायतीचे नुकसान होऊनही त्याबाबतची भरपाई देण्यास देखील दगड खाण व्यवसायिक टाळाटाळ करत आहे त्यामुळे नाराजी आहे.
या व्यवसायिकांकडून महसूल यंत्रणा कर घेते या करातील रक्कम शेतीचे व घरांचे नुकसान हाेणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी द्यावी अशी मागणी देखील आहे त्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले नाहीत पण त्याबाबत बैठकही घेण्यात आली नाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी आहे











































