मतदानाचा हक्क बजावा आणि २० टक्के घवघवीत सूट मिळवा
पुणे – जनसंपर्क न्यूज ( २२एप्रिल ) – लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग देशभर मतदानाबाबत जागृती करत आहे. त्याच बरोबर पुण्यातील नाना पेठ येथील सीट कव्हर आणि एक्सेरीसमध्ये सुप्रसिद्ध असलेले नाव शंकरराव पवार सीट कॉर्नरचे राजेश पवार यांनी ‘जास्तीजास्त संख्येने मतदान करा’ असं आव्हान मतदारांना केलं आहे.
मतदानाचा हक्क बजावल्यास
शंकरराव पवार सीट कॉर्नरमध्ये सीट कव्हर आणि एक्सेरीसवर २० टक्के घवखवतीत सूट देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
लोकांनी जास्तीजास्त संख्येने मतदान करावं म्हणून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत ग्राहकांना या सवलतीचा लाभ घेता येईल. ज्यांच्या बोटावर मतदानाची शाई असेल केवळ त्यांनाच या सवलतीचा लाभ घेता येईल असे राजेश पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मतदानाबद्दल जागृती करण्यासाठी व पुण्यातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून
शंकरराव पवार सीट कॉर्नर यांच्या तर्फे हे पाऊल उचललं आहे.’ अशी माहिती राजेश पवार यांनी दिली आहे. तरी जास्तीतजास्त पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.











































