जनसंपर्क न्यूज – पुणे – ( २३ एप्रिल) – लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग देशभर मतदानाबाबत जागृतीसाठी मोहीम राबवली होती. त्याच मोहिमेला पुण्यातील नाना पेठ येथील सीट कव्हर आणि एक्सेरीसमध्ये सुप्रसिद्ध असलेले नाव शंकरराव पवार सीट कॉर्नरचे राजेश पवार यांनी ‘जास्तीजास्त संख्येने मतदान करा’ असं आव्हान मतदारांना केलं केले होते.
मतदानाचा हक्क बजावल्यास शंकरराव पवार सीट कॉर्नरमध्ये सीट कव्हर आणि एक्सेरीसवर २० टक्के सूट दिली. लोकांनी जास्तीजास्त संख्येने मतदान करावं म्हणून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी पवार म्हणाले मतदान हा आपला सर्वात मोठा आपला अधिकार आहे. तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. मतदान करणे आपले परम कर्तव्य असल्याने जास्ती जास्त नागरिकांनी मतदान करावे म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला होता. नागरिकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आगामी काळात आम्ही असे देश व नागरिक हिताचे विविध उपक्रम राबवणार आहोत. असे पवार यांनी सांगितले.











































