सैराटच्या कथेची डॉक्युमेंटरी “सैराटच्या नावानं चांगभलं”

562

जनसंपर्क न्यूज – सैराटच्या कथेची डॉक्युमेंटरी “सैराटच्या नावानं चांगभलं”  आता यूट्यूबवर पाहायला मिळणार असे नागराज मंजुळे म्हणाले ते पुढे असे म्हणाले की  सैराट’ रिलीज होऊन तीन वर्षे झाली.दिवस खूप वेगात निघून जातात.प्रत्येक वर्तमान क्षण भूतकाळ होत जातोय नि आठवणीत जमा होतोय. ‘सैराट’साठी सगळ्याच टीमनं घेतलेले कष्ट केलेले उपद्व्याप ह्याच्या खूप आठवणी आहेत. ह्या पडद्यामागच्या कथेची डॉक्युमेंटरी “सैराटच्या नावानं चांगभलं” च्या रूपानं जतन करून ठेवावी म्हणून केली. गार्गीनं ती दिग्दर्शित केली. कुतुब इनामदार,वैभव दाभाडे,वसीम मुल्ला यांनी ती एडिट केली.अमित भोकसे, भूषण मंजुळे, ललित खाचने व सर्व आटपाट टीमने खूप मोलाची भर घातली

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून “सैराटच्या नावानं चांगभलं” (पहिला एपिसोड/ सहा भाग) आटपाटच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध होत आहे याचा आनंद वाटतोय.( उद्या सकाळी 8 वाजता ) वेळ मिळाला तर नक्की बघा. असे त्यांनी सांगितले