आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून महाराष्ट्राच्या लढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन

551

जनसंपर्क न्यूज – महाराष्ट्र विधिमंडळ येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांच्या हस्ते आणि विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रतोद आ.डॉ.नीलम गोऱ्हे, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे,अधिकारी सर्वश्री महेंद्र काज,राजकुमार सागर,अवर सचिव उमेश शिंदे, आ.डॉ.गोऱ्हे यांच्या भगिनी जेहलम जोशी उपस्थित होते. यावेळी आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबई येथील हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले.