जनसंपर्क न्यूज – सांगवी ( १ मे ) – सांगवीतील येथील मधूबन सोसायटी मधील लेन नंबर ९ मध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची झालेली दुरवस्था पाहवत नाही.

अंत्यत सुरेख व निसर्गाच्या सानिध्यात असलेलेे हे उद्यान एकेकाळ डोळ्याचे पारणे फेडत असे. नयनरम्य रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे, पक्षी, हिरवळ, सुशोभित चालण्याचे ट्रॅक पाहून मन प्रसन्न होवून जात असे. म्हणून तर अल्पावधीतच हे उद्यान अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

मात्र काही महिन्यांपासून या उद्यानाकडे झालेले दुर्लक्ष त्यामुळे सध्या उद्यानाची झालेली दुरवस्था पाहवत नाही.देखभाल, सुरक्षा, व्यवस्थापन याचा बोजवारा उडाल्याने या उद्यानाला उतरती कळा लागली आहे.
स्वच्छतागृहाची अवस्था दैयनिय झाली आहे. नळ आहेत पण नळाला चाव्या व नळांना पाणी नाही. लहान मुलांसाठी असलेली खेळणी मोडकळीस आली आहेत.

तर काही मोडली आहेत. झाडांची निघा नसल्याने झाडे प्राण सोडत आहेत. हिरवळ नाहीशी होत चालली असून सकाळ व संध्याकाळी त्या हिरवळीवर लोक बिनदास्तपणे फूटबॉल, बॅडमिंटन, व्यायाम, धावपळ असे राजरोसपणे करत आहेत.

गार्डनमध्ये शाळेतील व महाविद्यालयातील तरुण तरुणी अश्लील चाळे करत बसलेले असतात. रंगीबेरंगी फुले तोड्यासाठी अनेजन चक्क पिशवी घेवून येतात. बिनदास्तपणे नियमितपणे फुले
तोडून घेवून जातात. गार्डनमध्ये मच्छरांचे प्रमाण खूप वाढल्याने दोन मिनिटात मच्छर लोकांना बिलगतात. स्वागत कमानीच्या गेटच्या पट्टया तुटल्या आहेत.

असे अनेक समस्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये मगरसारखे तोंड वासुन बसल्या आहेत. या समस्यांवर निराकरण लवकर व्हावे अशी मागणी सांगवीतील नागरिकांकडून होत आहे.
















































