जनसंपर्क न्यूज – ( 15 मे ) पुणे – शेतकरी राजाला सुखावणारी आनंदाची बातमी म्हणजे मान्सूनचा पाऊस यंदा मान्सूनचं आगमन वेळेत होणार असल्याने शेतकरी राजा सुखवणार आहे.

नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबणीवर पडले आहे. 6 जून रोजी तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. स्कायमेट पाठोपाठ आयएमडीने केरळमधील यंदाच्या वर्षीची आगमनाची तारीख बुधवारी (दि.15) जाहीर केली. दरम्यान, स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल होणार असून आयएमडीच्या अंदाजानुसार तो आणखी दोन दिवस उशिराने दाखल होणार आहे. केरळमध्ये वेळापत्रकानुसार 1 जून रोजी मान्सून दाखल होतो व राज्यात 7 जून रोजी त्याचे आगमन होते.

राज्यात 12 जून रोजी मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पुणे, मुंबईत तो 14 किंवा 15 जून रोजी डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेटे येथे तो 18 किंवा 19 जून रोजी दाखल होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.