सनी पवारला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार

638

अमेरिकेतील १९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘चिप्पा’ चित्रपटासाठी सनी पवार याला  सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार मिळाला असून मी दिग्दर्शित केलेल्या अ.ब.क चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत होता. अ.ब.क चित्रपटाद्वारे त्याने मराठीत पदार्पण केले होते. या अगोदर तो ऑस्करमध्ये दाखल झालेल्या  द ‘लायऑन’ चित्रपटात काम केले होते.

त्याच बरोबर तो नेटफ्लिक्सवर गाजलेली  ‘सेक्रेड गेम’ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा लहानपणीचा रोल त्याने केला होता. येवढ्या लहान वयात त्याला असलेली अभिनयाची समज वाखाण्याजोगी आहे.

मराठी कलाकाराला मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी व देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. सनी खूप खूप तुझं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.