जनसंपर्क न्यूज – अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने जपली सामाजिक बांधिलकी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गैारव करण्यात आला. या निमित्त खास विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबागजवळील कच्छीभवन येथील सभागृहात रविवारी 29 जून रोजी हा कार्यक्रम पार पडला.

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन गुणवंत विद्यार्थ्यांचा गेल्या 12 वर्षापासून गैारव करीत आहे. याही वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला असून दहावीमध्ये एक ते तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील बेलोशी, रेवदंडा, खंडाळे, खानाव, बामणगाव, कुरुळ, चोंढी, थळ, नागाव, बहिरोळे, वरसोली, अलिबाग अशा वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा गैारव करण्यात आला. यावेळी पिल्लई एचओसीएल एज्युकेशन कॅम्पसचे प्राध्यापक प्रतिक म्हात्रे, सिध्देश खानविलकर, रायगड फोटोग्राफर्स व व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सुभेकर, सचिव समीर भायदे, खजिनदार जितेंद्र मेहता, सल्लागार चंद्रकांत धुमाळ अलिबाग फोटोग्राफर / व्हिडीओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, उपाध्यक्ष तुषार थळे, सचिव अमोल नाईक, खजिनदार राकेश दर्पे, सचिन असराणी, कार्याध्यक्ष सचिन म्हात्रे, सुबोध घरत, जितेंद्र शिगवण, प्रशांत नाईक, विवेक पाटील, अभिजित काटकर, योगेश सावंत, इर्शाद कप्तान, विकास पाटील, सुदेश माळी, विजय पाटील, संदेश कवळे आणि अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या गुणगैारव सोहळ्याचे औचित्य साधून मार्गदर्शन शिबीर भरविण्यात आले. यावेळी प्रतिक म्हात्रे यांनी सांगितले, दहावी बारावीनंतर कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर तेथे शिष्यवृत्ती कशी मिळवावी याबाबत सखोल माहिती दिली. तसेच केंद्रीय अभ्यासक्रम प्रक्रीयेबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सिध्देश खानविलकर, विवेक सुभेकर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे सचिव अमोल नाईक यांनी तर आभार अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे यांनी मानले.