जनसंपर्क न्यूज ( मुंबई प्रतिनिधी ) – अभिनेता अक्षय कुमारचे या वर्षी एका मागोमाग एक बरेच सिनेमे रिलीज होत आहेत. अशातच अक्षय कुमारने त्याच्या नव्या सिनेमाची दणक्यात घोषणा केली आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘बच्चन पांडे’. अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिनेमाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. यामध्ये त्याचा लूक अगदी हटके आहे. काही मिनिटांतच त्याच्या या लूकची जोरदार चर्चा सुरु झाली. यामध्ये अक्षय कुमार कपाळाला भस्म, गळ्यात जाडजूड चेन आणि लुंगी अशा वेगळ्याच अवतारात दिसत आहे.ज्यात अक्षयला ओळखणंही कठीण झालं आहे. या पोस्टरवरील अक्षयचा लुक खूपच वेगळा आहे. हा त्याचा लुक आतापर्यंतचा सर्वात वेगळा लुक मानला जात आहे. या सोबतच या सिनेमाची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे.
सूत्रांनूसार, बच्चन पांडे चित्रपट हा मसालापट असणार आहे. 2020 च्या नाताळमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन फरहद समजी करणार आहेत. तर, निर्माते साजिद नाडियाडवाला हे आहेत.








































