जनसंपर्क न्यूज – वीर धरणामध्ये आज दि. 28/07/2019 रोजी दुपारी 3.00 वाजता एकूण पाणीसाठा 9.195 टीमसी (93.20%) झाला आहे. सध्या धरणामध्ये 11563 क्यूसेक्स इतका हवा  येत आहे. तरी दुपारी 4 वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे नीरा नदीमध्ये 4600 क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. सदर विसर्गत धरणामध्ये येणाऱ्या येव्याच्या प्रमाणात टप्प्या टप्पाने वाढ करण्यात येणार आहे.

अ. पं. निकम
कार्यकारी अभियंता
नीरा उजवा कालवा विभाग
फलटण