Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – पुणे – सालाबादाप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील तब्बल ४६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहिर करण्यात आली आहेत. ५ जणांना विशेष सेवेसाठी तर ४१ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापूर पोलिस दलातील करवीर उपविभागातील उपविभागीय अधिकारी राजाराम पाटील, मुंबईच्या साकीनाका विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील एसआरपीएफमधील असिस्टंट कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर पोलिस दलातील विशेष शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) मारूती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































