जनसंपर्क न्यूज पुणे –   २१०० मेहंदीच्या कोनांपासून इकोफ्रेंडली गणपतीची मूर्ती  उभारून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. प्रदूषण विरहीत अशी बाप्पांची मूर्ती सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. बाल साईनाथ मंडळ ट्रस्ट व प्रवीण मेंहदी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उप्रकम राबला गेला असून याचे नुकतेच उदघाटन रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका व ग्राहक पेठचे सुर्यकांत पाठक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रविण मेहंदीचे संस्थापक राजमल ओसवाल, निर्मल ओसवाल याच बरोबर गणपतराज मेहता गोडवाड जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, स्टेशनरी कटलरी जनरल असोचे अध्यक्ष दिलीप कुंभोजकर  प्रविण ओसवाल यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना फतेचंद रांका म्हणाले कि गणपती हे आपल्या अखंड हिंदुस्तानचे दैवत असून पुण्यात आपण मोठ्या थाटामाटात गणपतीचे आपण स्वागत व पूजाअर्चा करतो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळख असलेल्या बाप्पाचा उत्सव आपण पर्यावरणाला पूरक व प्रदूषण विरहीत करायला हवा. बाल साईनाथ मंडळ ट्रस्ट व प्रवीण मेंहदी यांनी साकारलेला इकोफ्रेंडली बाप्पाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

प्रमोद ओसवाल म्हणाले की आम्ही २१०० मेहंदीच्या कोनांपासून इकोफ्रेंडली श्रींची मूर्ती साकारली असून १६ फुट मेहंदीचा कोन व झगमगती विद्युत रोषणाई आमच्या मंडळाचे आकर्षण आहे. आमच्या मंडळाच्या १० कार्यकर्त्यांनी सलग १० दिवस राबून हि इकोफ्रेंडली गणपतीची मूर्ती साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे.

यावेळी बाल साईनाथ मंडळ ट्रस्ट अध्यक्ष सचिन चरोळी, सुनील गुरव, सुर्यकांत पाठक, शिरीष बोधनी, मदनसिंह राजपूत, राजेश गांधी, राजकुमार गोयल,सचिन जोशी, सुरेश नेऊरगावकर असे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर आभार प्रमोद ओसवाल यांनी मानले.