जनसंपर्क न्यूज पुणे – रॉबिनहूड आर्मी या युवकांच्या स्वयं प्रेरणेतून जन्माला आलेल्या NGO च्या खराडी Chapter च्या सुमारे 500 ते 600 युवा सभासदांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या व भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री सिध्दीविनायक शारदा गजाननाच्या उत्सव प्रसंगी भेट दिली. ही NGO भागातील विविध हॉटेल्स ,मंगल कार्यालये अथवा ज्यांच्या कडे चांगले अन्न शिल्लक राहिले असेल त्यांचे कडून गोळा करून ते शहरातील विविध भागांतील गरजू लोकांना वाटप करते ते सुद्धा विना मोबदला या NGO मधील सर्व युवा वर्ग हे काम आपापल्या कॉर्पोरेट नोकऱ्या सांभाळून करतो हे महत्वाचे व या बरोबर इतर अनेक उपक्रम देखील राबवतो तर मग अश्या या युवा वर्गाचा सन्मान करून त्यांना पाठिंबा देणे हे अखिल मंडई मंडळ कर्तव्य मानते. काल ह्या युवा वर्गाच्या हस्ते श्री सिध्दीविनायक शारदा गजाननाची आरती करून समाज मंदिरात त्यांचा व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी अखिल मंडई मंडळाचे सुरज अण्णासाहेब थोरात आणि ऍड मंदारभाऊ जोशी उपस्थित होते.