Home ताज्या घडामोडी गणपती बाप्पांचे घेता येणार ऑनलाईन दर्शन 

गणपती बाप्पांचे घेता येणार ऑनलाईन दर्शन 

438
जनसंपर्क न्यूज – जगभरातील गणरायाच्या भक्तांना www.puneagneshfestival.com या संकेत स्थळावर दर्शन घेण्यास मिळणार, या संकेतस्थळाचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक एकमेकाशी जोडला गेला आहे. याच तंत्रज्ञान माध्यमाचा पुण्यातील  स्वप्निल नहार, अनुराग वैद्य,सुप्रसाद पुराणिक  या तरुण एकत्रित आपल्या लाडक्या गणरायाचे सर्वाना सोशल मिडियाच्या माध्यमातून दर्शन घडविण्यासाठी 2019 गणेश उत्सवाासाठी
www.puneagneshfestival.com हे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाचे उदघाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
      या संकेतस्थळ द्वारे शहरातील प्राचीन बापाच्या मंदिराचा इतिहास आणि काही गणेश मंडळाच्या देखाव्याचे जगभरातील बापाच्या भक्तांना www.puneagneshfestival.com या संकेत स्थळावर एका क्लिकवर मिळणार आहे. ही बापाच्या भक्तांना आनंदाची बाब आहे.
    या संकेतस्थळाच्या उदघाटन प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, जगभरातील प्रत्येक जण सोशल मिडीयावर सक्रिय असून आज याच माध्यमाचा पुण्यातील स्वप्निल नहार, अनुराग वैद्य या तरुण एकत्रित सर्वांना पुण्यातील गणरायाचे दर्शन घडविण्यासाठी या संकेतस्थळा च्या माध्यमातून काम करणार आहेत. या त्यांच्या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वप्नील नहार म्हणाले,गेली 9वर्ष पुण्यातील गणपती उत्सव जगभरात पोहचावा यासाठी विविध उपक्रम आम्ही करत असतो. यंदाही गणपतीचे 10 दिवस 10 हेरिटेज वॉक आयोजित केले आहेत असे फिरस्तीचे अनुराग वैद्य यांनी सांगितले.