जनसंपर्क न्यूज – पुणे – महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे येथिल सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या वतीने २५ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री पुणे शहरात पडलेल्या भयानक पावसात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या मध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावून नागरिकांना वाचविनाऱ्या पोलीस दल आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार पुणे शहर पोलीस आयुक्त, डॉक्टर के.व्यंकटेशम यांचे हस्ते आज दि.29/09/2019 रोजी पार पडला.
त्या प्रसंगी डावीकडून अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे,दत्तवाडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे,स्वारगेट पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मनंद नायकवडी संस्थेचे विश्वस्त ऍडवोकेट प्रताप परदेशी,डॉक्टर मिलिंद भोई व इतर पोलीस कर्मचारी व भक्तगण उपस्थित होते.या वेळेस संस्थेने संपूर्ण पोलीस दल आणि अग्निशामक दलाच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांचे आभार मानले.