ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे काळाच्या पडद्याआड

824

मुंबई – जनसंपर्क न्यूज – ‘शोले’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कालिया’च्या भूमिकेद्वारे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने गावदेवी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते.