जनसंपर्क न्यूज ( सातारा ) – महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘ नवरत्न दर्पण पुरस्कार – २०२० ‘ साठी सातारा जिल्ह्यातील प्रथितयश पत्रकार व दै . सामनाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी गजानन चेणगे यांची निवड झाली आहे . सन्मानचिन्ह , मानपत्र , शाल , श्रीफळ , गुलाबपुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . अभ्यासू , चिकित्सक तसेच निर्भिड पत्रकार म्हणून ओळख असलेल्या गजानन चेणगे यांनी पुढारी , ऐक्य , सामनामध्ये दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे . सातारा आकाशवाणीसाठी असंख्य कार्यक्रमांचे लेखन त्यांनी केले आहे . तसेच आजवर सामाजिक , राजकीय , कृषी , सहकार क्षेत्रांसह विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे . पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली असून अनेक महत्वपूर्ण विषय मार्गी लावण्यात त्यांचे योगदान आहे . वरूणराज भिडे पारितोषिक , स्वामी विवेकानंद युवा साहित्यिक – पत्रकार पुरस्कार , समाजरत्न पुरस्कार , गौरीशंकर पत्रकारिता पुरस्कार आदी विविध सन्मान त्यांना लाभले आहेत . त्यांच्या ‘ प्रभातीचे रंग ‘ या पुस्तकासही ना . ह . आपटे ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे . चेणगे यांच्या चौपैर कार्याची दखल घेऊन फौंडेशनने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे . पत्रकार दिनाच्या आदल्या दिवशी , म्हणजे ५ जानेवारी रोजी सातारा येथील शाहू कलामंदिरात आयोजित समारंभात हा पुरस्कार गजानन चेणगे यांना प्रदान करण्यात येणार आहे , अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ . राजीव लोहार यांनी दिली .
यंदाचा ‘नवरत्न दर्पण पुरस्कार गजानन चेणगे यांना जाहीर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































