नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

886

जनसंपर्क न्यूज – अभिनेते  श्रीराम लागू यांचे आज पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांचा जन्म सातारा येथे 16 नोव्हेंबर 1927 मध्ये झाला होता. त्यांनी 1972 पासून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांचे नटसम्राट हे नाटक खूप गाजले होते. नटसम्राट नाटकात त्यांनी साकारलेली गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका खूप गाजली आणि ती त्यांनी अनेक वर्षे रंगवली होती.