आठवणीतील डॉक्टर….
जर वर्षी डॉ. श्रीराम लागू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटण्यासाठी मी आवर्जून त्यांच्या राहत्या घरी नवसह्याद्री सो या ठिकाणी जात असे. त्यांच्या घराच्या हॉलमध्ये त्यांना मिळालेले पुरस्कार ठेवले आहेत. घरात जाताना विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन यांचे लावलेले पोस्टर डोळ्यासमोर अजून तरळत आहे. ९० व्या वर्षात ही त्यांना चित्रपटात काम करायचं आहे अशी त्यांनी इच्छा माझ्या समोर व्यक्त केली होती. या वर्षी त्यांना मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्यांची भेट नाही होऊ शकली. त्यांच्या पत्नी दीपा लागू यांनी पाहुणचार केला आणि म्हणाल्या दादा (डॉ लागू ) अजून उठला नाही आज काल तो उशिरा उठतो. तबियत बरी नसते. मला त्यांना पाहून तरी जावं अस वाटलं पण त्यांचं दर्शन झालं नाही. जिन्याच्या पायऱ्या उतरताना मनात पाल चुकचुकली त्यांची काळजी वाटली. आई जंगदंबेचा मी धावा केला जगदंब जगदंब लवकर बरे कर त्यांना आणि भरभर जिने उतरून मी खाली आलो.
नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या सोबत २ वर्षांपूर्वी चित्रपट या विषयावर खूप गप्पा रंगल्या होत्या. तो क्षण…
दिग्दर्शक रामकुमार शेडगे

















































