कराडमध्ये कोरोनाचे नवे पाच रुग्ण सापडले

407

कराड तालुक्यात कोरोनाची रूग्ण संख्या १६

कराड (जनसंपर्क न्यूज ) – कराड तालुक्यात कोरोना रूग्णांची साखळी तुटेना झाली असून आज अचानक कोरोनाबाधित पाच रूग्ण वाढले. हे सर्व रूग्ण कोरोनाबाधित रूग्णांच्या निकटसहवासित असल्याने त्यांना कऱ्हाडातील उपजिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आता एकट्या कराड तालुक्यात कोरोनाची रूग्ण संख्या १६ झाली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कराडात प्रतिबंधक उपाय कडक करूनही कोरोनाबाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत नाही. आज अचानक कोरोनाचे पाच रूग्ण सापडले. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागापुढे नेमके काय करावे, असा प्रश्न उभा राहिला आहे.