सरश्री यांचे अनमोल विचार ऐकण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

327

जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – प्रख्यात वक्ते सरश्री यांचे विचार ऐकण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून येत्या ३० तारखेला सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मनन आश्रम, पुणे येथे सरश्री यांचे अनमोल विचार ऐकण्याची तसेच निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या पुण्यातील मनन आश्रमाच्या सुंदर आणि पवित्र भूमीवर हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, जिथे आजवर लाखो लोकांना जीवनाची नवी दिशा सापडली आहे. तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांचे  विचार ऐकण्याची संधीही उपलब्ध झाली आहे.

रोजच्या धावपळीच्या आयुष्यातल्या अडचणी, त्यामुळे येणारे नकारात्मक विचार, यामुळे तुम्ही सतत मानसिक त्रास या सगळ्यामुळे आपल्याला शांत आणि संतुष्ट जीवन कधीच जगता येणार नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर संपूर्ण मनःशांती प्राप्त करण्याचा सोपा, सरळ मार्ग म्हणजे आत्मज्ञानाची गुरुकिल्ली हा आहे. तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांचे  विचार ऐकण्याची विनामूल्य संधीही उपलब्ध झाली असून जास्तीत जास्त पुणेकरांनी या शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशन यांच्याकडून करण्यात आले आहे.