प्रथम इंदापूर नॅशनल फोटोग्राफी स्पर्धेला रसिकांचा उदंड प्रतिसाद

559

जनसंपर्क न्यूज – इंदापूर येथील ग्रीन वूड क्रिएशन मार्फत नुकतेच इंदापूर येथील केशर चित्रपटगृहात पहिल्यांदा राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र, कोलकत्ता, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक इ. राज्यातून १५५ फोटोनी सहभाग घेतला होता यापैकी १३३ फोटो प्रदर्शनासाठी निवडण्यात आले होते.स्पर्धत ओपन कॅटेगिरीमधून ‘डॉ. अनिस मुजावर’ वाईल्ड लाईफ कॅटेगिरीमधून ‘अमर ठाकूर’ प्री वेडींग कॅटेगिरीतून ‘अक्षय येवगे’ कॅन्डीड कटेगिरीमधून ‘प्रदुत कुमार डे’ ओल्ड टेम्पल कॅटेगिरीतून ‘नितीन बस्ते’ यांनी बेस्ट फोटो हा किताब पटकावला.

प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या दर्शकानी दिलेल्या पसंतीत म्हणजेच बेस्ट पब्लिक चॉईस अॅवार्ड ओपन कॅटेगिरीमधून ‘आशुतोष भोसले’ वाईल्ड लाईफ कॅटेगिरीमधून ‘ओंकार विंचू’ प्री वेडींग कॅटेगिरीतून ‘विशाल खामकर’ कॅन्डीड कटेगिरीमधून ‘अक्षय येवगे’ ओल्ड टेम्पल कॅटेगिरीतून ‘रमेश गणेशन’ यांनी पटकावला.

कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख पाहुणे युवाक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांतदादा शिताप यांच्या हस्ते झाला तर यावेळी वसंत गुडेकर उपस्थित होते, ४ तारखेला संध्याकाळी पार पडलेल्या बक्षिस वितरण समारंभास रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे माजी अध्यक्ष मा.श्री. ज्ञानदेव डोंबाळे सर, किरण जाधव सर, स्पर्धाचे ज्युरी सदस्य प्रशांत बी. तसेच फेस्टीवलचे दिग्दर्शक सोमनाथ जगताप उपस्थित होते. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सोमनाथ जगताप यांनी अशाच प्रकारे पुढील वर्षी सुध्दा राष्ट्रीय पातळीवर अधिक जोमाने इंदापूर शहराचे नाव करण्याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करू असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुत्रसंचलन जाधव सर यांनी केले कार्यक्रमासाठी वैभव करे, पिनू जगताप, सौरभ वाघमारे, सौरभ जाधव, प्रतिक्षा हिंगणे, दत्ता पांडे, स्वरूप गादे, आकाश करे, प्रशांत गाडेकर यांनी प्रयत्न केले.