जनसंपर्क न्यूज – पुणे , 6 सप्टेंबर : दरवर्षीप्रमाणे दिल्या जाणा – या आर्किटेक्चर क्षेत्रातला ग्लोबल स्मार्ट पुरस्कार टीम वन आर्किटेक्ट कंपनीच्या सहयोगी संचालक वर्षा चांगडिया यांना दिला गेला आहे . दिल्ली डेव्हलपमेंट अधिकारचे माजी आयुक्त संजय पाठक यांच्या हस्ते हा प्रस्कार प्रदान करण्यात आला . आर्किटेक्चर म्हणजेच वास्तुकला हे क्षेत्र केवळ विसतीर्ण क्षेत्र नाही , तर अखंडित क्षेत्र आहे . विविध प्रकारच्या वास्तुकलेचा अभ्यास या क्षेत्रात केला जातो . वास्तु रचना , वास्तुचे नक्षीकाम असे विविध प्रांत या क्षेत्रात समाविष्ट आहे . अशा याँ वास्तुक्षेत्रात अविरत आणि अखंडपणे हा सेवा करणा – याला हा पुरस्कार दिला जातो . वर्षा चांगडिया या वास्तुक्षेत्रात गेली वीस वर्षे कार्यरत आहे . साध्या मारवाडी कुटुंबातून आलेल्या वर्षी यांना लहानपणापासूनच आर्किटेक्चरची आवड होती . या जगाचे आपण देणे लागतो आणि त्यासाठी आपण काहीतरी करावे , या हेतूने त्यांनी आर्किटेक्चर या क्षेत्रात प्रवेश केला . सध्या त्या टीम वन आर्किटेक्ट या कंपनीमध्ये सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत . परसिस्टंट सारख्या मोठ्या कंपन्यांची अंतर्गत व्यवस्थेचं कामकाज पाहिल्यानंतर आता त्या टीम वन या कंपनीमध्ये कार्यरत आहेत . पुरस्कारानंतर बोलताना वर्षा यांनी सांगितलं की आर्किटेक्चर हे क्षेत्र अशा पद्धतीने विकसित झालं आहे की रोज या क्षेत्रातून नवीन गोष्ट शिकायला मिळते . अशा या विकसनशील क्षेत्रात काम करण्याचा अभिमान असल्याचं वर्षा यांनी नमूद केलं . त्याचबरोबर या क्षेत्रात सतत काम करत रहाण्याचा ध्यास घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं .
ग्लोबल स्मार्ट बिल्ट समिट पुरस्कार टीम वन आर्किटेक्टच्या वर्षा चांगडिया यांना प्रदान
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































