Home ताज्या घडामोडी हडपसर मधील ससाने नगर येते भरला बाल जमुनचा आनंद मेळा.

हडपसर मधील ससाने नगर येते भरला बाल जमुनचा आनंद मेळा.

497

दादासाहेब काशीद याचकडून – ( जनसंपर्क न्यूज )
पुणे – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हडपसर ससाणे नगर येथील बिनावत मॅजेस्टिक सोसायटीमध्ये या बाल दिनाच्या निमित्ताने विविध पारंपारिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मनोरंजक खेळ, विविध गुणदर्शन कार्यक्रम, बाल सभा, वाचू आनंदे, मामाचं पत्र हरवलं असे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.
यावेळी जमलेल्या बालकांच्या पाल्यांना मार्गदर्शन करताना सोसायटीचे अध्यक्ष अनिल व्हावळ म्हणाले, लहान वयापासूनच मुलांना शारीरिक, बौद्धिक व पारंपारिक खेळांचे आणि आपल्या संस्कृतीचे ज्ञान देणे गरजेचे आहे. तरच भावी पिढी सशक्त आणि समृद्ध होईल.
सोसायटीचे सचिव भूषण कोंडावार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खजिनदार डॉक्टर विवेक काळे, कार्यकारणी सदस्य श्रीनिवास परब, निलेश भास्करे, जितेंद्र खिलारे, गणेश आबनावे, रवींद्र मठ, विनोद शिरसागर आणि सोसायटीतील सर्व महिला वर्ग यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.