हम धंदा मिठाईका करते है ! लेकिन वफादारी नमक जैसे निभाते है !

इरफान यांचा शेवटचा चित्रपट अंग्रेजी मिडीयम नुकताच हॉट स्टार वरती पाहिला. काय म्हणावं या कलाकाराला त्यांचा प्रत्येक चित्रपट मनावर अधिराज्य गाजवून जातो. मात्र हा चित्रपट बाप लेकीच्या अतूट नात्यावर थेट भाष्य करणारा आहे. हा चित्रपट तुम्हाला हसवतो रडवतो आणि खूप काही शिकवून जातो मुलांच्या आभाळा एवढ्या स्वप्नांची पूर्तता करता करता आई वडिलांची होणारी ससे होलपट कशी होते तरी भक्कमपणे हिमालयासारखा ताठ मानेने मुलांच्या पाठीशी बाप उभा असतो

इरफान यांच्या अभिन्याबद्दल काय बोलावे प्रत्येक त्यांच्या सीनला मन गहिवरून येत आणि अश्रूंचा बांध फुटतो तर कधी
धबधब्यासारखे खळखळून हसू आणतो काय म्हणावं या कलाकाराला जीव ओतून काम करणारा या कलाकाराची अचानक झालेली एक्झिट मनाला सुरुंग लावून गेली.

मनात आठवणींची शिदोरी ठेवुन गेली

लोग अच्छे हैं बहुत दिल में उतर जाते हैं ,
इक बुराई है तो बस ये है कि मर जाते हैं ।

रामकुमार शेडगे
दिग्दर्शक